Terms of use and privacy policy of khed taluka online

Terms of Use and Privacy Policy of khed taluka online . com

खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळ वापराचे नियम व अटी

सर्वसाधारण संकेतस्थळ वापर नियम व अटी:

  • या संकेतस्थळाचा वापर आपण पूर्णपणे स्वजबाबदारीने करत आहात.
  • संकेतस्थळावरील संपूर्ण कार्यपद्धती/कार्यप्रणाली आपणांस माहिती व मान्य आहे तसेच त्याबद्दल आपली कोणत्याही प्रकारची तक्रार नाही.
  • संकेतस्थळावरील माहितीस संकेतस्थळचालक जबाबदार नाही त्याचप्रमाणे सदर माहितीमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस किंवा आर्थिक नुकसानीस संकेतस्थळचालक जबाबदार नाही.
  • संकेतस्थळामार्फत फक्त माहितीची देवाण-घेवाण केली जाते, त्याची जबाबदारी स्विकारली जात नाही.
  • संकेतस्थळाद्वारे कोणत्याही प्रकारे पैशाचे व्यवहार केले जात नाहीत.
  • आपण पुरविलेली माहिती संकेतस्थळाद्वारे कोणत्याही त्रयस्त व्यक्ती, संस्था अथवा समुदायाशी सामायिक केली जात नाही.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावरील छायाचित्रे तसेच माहितीचा वापर इतरत्र करू नये.
  • संकेतस्थळावरील माहितीचा वापर कोणत्याही अवैध प्रकारे अथवा बेकायदेशीर रित्या संकेतस्थळचालकाकडून केला जात नाही. सदर माहितीचा त्रयस्त व्यक्तींद्वारे गैरवापर झाल्यास त्याबद्दल संकेतस्थळचालक जबाबदार नसून ही जबाबदारी सर्वस्वी वापरकर्ता तसेच माहिती पुरविणाराची असेल त्याचप्रमाणे त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस किंवा आर्थिक नुकसानीस वापरकर्ता अथवा माहिती पुरवठादार पूर्णपणे जबाबदार असेल.
  • संकेतस्थळावर आपण पुरवत असणारी माहीती पूर्णपणे शुद्धावस्थेत तसेच स्वेच्छेने देत असून ती पूर्णपणे सत्य आहे. आपण पुरविलेली माहीती असत्य आहे असे उघड झाल्यास सदर माहिती आपणांस न कळविता संकेतस्थळावरून हटविण्याचा अधिकार संकेतस्थळचालकास असेल. तसेच त्याद्वारे निर्माण होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीस किंवा आर्थिक नुकसानीस माहिती पुरवठावदार पूर्णपणे जबाबदार असेल.
  • संकेतस्थळामार्फत फक्त आपली वैयक्तीक माहिती विचारली जाते. कोणत्याही प्रकारचे बँक खाते किंवा चलनाशी निगडीत माहिती संकेतस्थळाद्वारे विचारली जात नाही.
  • संकेतस्थळामार्फत आपली वैयक्तीक माहिती जाहीर करण्यास आपणांकडून कोणत्याही प्रकारचे बंधन नाही तसेच याच्या विरुध्द आपण कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही.
  • संकेतस्थळावरील माहीती पूर्णपणे अधिकृत नसल्यामुळे सदर माहितीचा वापर कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर तसेच इतर कार्यासाठी केला जाऊ नये. अशा प्रकारे माहितीचा गैरवापर झाल्यास त्यास संकेतस्थळ जबाबदार नाही.
  • संकेतस्थळावरील माहीतीच्या आधारे समाजातील कोणत्याही जाती धर्माबद्दल द्वेष अथवा चुकीची माहीती पसरविण्याचा तसेच कुणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही. या माहीतीचा उपयोग सर्वतोपरी समाजाच्या हितासाठीच व्हावा असा उद्देश आहे.
  • संकेतस्थळावरून आपल्या नावाने पत्रव्यवहार, दूरध्वनी, भ्रमणध्वानी, इमेल, एस.एम.एस. किंवा इतर माध्यमांद्वारे आपणांस कोणत्याही वेळी संपर्क साधला जाऊ शकतो. या कृतीस आपली पूर्णपणे मान्यता आहे.
  • संकेतस्थळावरील विविध पानांवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती तसेच त्यातील चित्रे, मजकूर, रंगछटा याबद्दल आपले कोणतेही म्हणणे नाही तसेच सदर जाहिरातींसाठी आकारण्यात येणारे शुल्क आणि कालावधी याची आपणांस पूर्णपणे माहिती असून हे सर्व आपणांस मान्य आहे.
  • संकेतस्थळावर आपण पुरविलेल्या माहितीस किंवा जाहिरातीस येणाऱ्या प्रतिसादाबद्दल आपल्याला कल्पना असून त्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. सदर माहिती किंवा प्रतिसादाच्या सत्त्यतेविषयी संकेतस्थळचालक जबाबदार नाही.
  • काही तांत्रिक तसेच अपरिहार्य कारणांमुळे संकेतस्थळावरील माहिती आपणांस प्राप्त होऊ शकली नाही तर त्यामुळे होणाऱ्या मनस्ताप किंवा उद्भवणाऱ्या आर्थिक तसेच सामाजिक परिस्थितीस संकेतस्थळचालक जबाबदार नाही.
  • संकेतस्थळामध्ये निर्माण होणारे वापरकर्ते तसेच त्यांनी पुरविलेली माहिती याविषयी संकेतस्थळचालक जबाबदार नाही. वापरकर्त्यानेे पुरविलेली माहिती संकेतस्थळावरून कोणत्याही क्षणी वापरकर्त्याला न कळवता काढून टाकण्याचा अधिकार संकेतस्थळ चालकाकडे असेल. संकेतस्थळाद्वारे वापरकर्त्याचे खाते अंशतः अथवा पूर्णपणे बंद केले जाऊ शकते.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, तीर्थक्षेत्र आळंदी, भीमाशंकर, संत ज्ञानेश्वर महाराज, भगवान शिवशंकर यांच्याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर माहिती ही केवळ सामान्य ज्ञान म्हणून देण्यात आलेली असून ती अधिकृत किंवा पूर्णपणे खरी आहे असा दावा संकेतस्थळाद्वारे केला जात नाही. सदर माहितीचा गैरवापर झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार राहणार नाही.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर खेडरत्न या पानावर खेड तालुक्यातील नावाजलेल्या अथवा ज्यांनी आपल्या असाधारण कर्तुत्वाने खेड तालुक्याचा नावलौकिक उंचावला आहे अशा व्यक्तींविषयी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे अशा व्यक्तींच्या गौरवकार्याचा परिचय दिलेला आहे. या व्यक्तींची खेडरत्न म्हणून निवड खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळाद्वारे करण्यात आलेली आहे. यास इतर व्यक्ती अथवा संस्थांचे दुमत असल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर समाजसेवक या पानावर खेड तालुक्यातील समाजसेवकांविषयी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे अशा व्यक्तींच्या गौरवकार्याचा परिचय दिलेला आहे. या व्यक्तींची माहिती समाजातीलच काही व्यक्ती व संस्थांनी दिलेली असून खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळाद्वारे ती प्रकाशित करण्यात आलेली आहे. या माहितीद्दल इतर व्यक्ती अथवा संस्थांचे दुमत असल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर तालुक्यातील गांवे या पानावर तालुक्यातील विविध गावांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ही माहिती गावातील नागरिक तसेच इतर व्यक्तींकडून देण्यात आलेली आहे. गावाविषयी शक्यतो सर्वतोपरी अचूक आणि अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यामध्ये चूक आढळल्यास अथवा माहितीमध्ये बदल झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, अशासकीय संस्था, पर्यटनस्थळे, दुकाने-आस्थापना, कारखाने-उद्योगधंदे, सेवा-सुविधा, पर्यटनसंस्था तसेच प्रबोधनकार या पानांवर वैयक्तिक तसेच सार्वजनिकरित्या मागविलेली माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. शक्यतो सर्वतोपरी अचूक आणि अद्ययावत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यामध्ये चूक आढळल्यास अथवा माहितीमध्ये बदल झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर नोकरी-रोजगार या पानावर विविध संस्था, कंपन्या त्याचप्रमाणे विविध उद्योग, व्यवसाय, कार्यालये याद्वारे नोकर भरती तसेच रोजगारविषयी जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. या जाहिराती पूर्णतः संबंधित संस्था चालकांद्वारे दिलेल्या असल्यामुळे त्यामधील माहिती, मजकूर, निमय व अटींविषयी संकेतस्थळ चालक जबाबदार नाही. इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीचा सखोल अभ्यास किंवा परीक्षण करूनच अर्ज करावेत. जाहिरातीतील फसवेगिरी अथवा चुकीच्या माहितीस संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्णपणे संबंधित संस्थेद्वारे पार पाडली जात असल्यामुळे संकेतस्थळ चालक त्याविषयी जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर खरेदी-विक्री या पानावर विविध वापरकर्त्यांकडूनच आपापल्या वस्तू व मिळकतीची परिपूर्ण माहितीसह विक्रीसाठी नोंद करण्यात येत असल्यामुळे सदर वस्तू व मिळकतीचे वर्णन, किंमत, दर्जा याविषयी संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. सदर वस्तू व मिळकतीचा खरेदी-विक्री व्यवहार, पैशांची देवाण-घेवाण तसेच बोली-चाली संकेतस्थळामार्फत होत नसल्यामुळे त्यास संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. सदर व्यवहारामध्ये भांडणे, मारामारी, वाद-विवाद निर्माण झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर वधू-वर सूचक या पानावर इच्छुक वधू व वरांविषयी माहिती देण्यात आली आहे. सदर वधू - वराची माहिती तसेच छायाचित्र वैयक्तिक अर्जदांरांकडूनच प्राप्त झालेली असल्यामुळे त्याविषयी संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. या माहितीमध्ये वधू वरांचा धर्म, जात, कूळ, गोत्र इत्यादी वैयक्तीक माहितीचा समावेश असतो. अशी माहिती अर्जदाराच्या परवानगीनेच प्रकाशित केली जाते व त्यास पूर्णपणे अर्जदार जबाबदार आहे. सदर माहिती सार्वजनिक झाल्यास अथवा त्रयस्त व्यक्ती किंवा संस्थेद्वारे माहितीचा गैरवापर झाल्यास त्यास पूर्णपणे अर्जदार जबाबदार आहे. या संकेतस्थळावरील जाहिरातीमुळे अर्जदारास कोणत्याही त्रयस्त अथवा अनोळखी व्यक्ती किंवा संस्थांकडून मागणी अर्ज, दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला जावू शकतो. अशा प्रकारच्या संपर्कास अथवा संभाषणांस संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. या पानावरील जाहिरातीमुळे विवाह संपन्न झाल्यास अथवा न झाल्यास संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत. या पानावरील जाहिरातीमार्फत विवाह संपन्न झाला आणि कालांतराने काही कारणांमुळे सदर विवाह मोडल्यास, घटस्फोट झाल्यास अथवा वैवाहिक जीवन विस्कळीत झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत. संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे विवाह संपन्न झाला आणि नंतरच्या काळात सदर माहिती चुकीची अथवा फसवी निष्पन्न झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत. जाहिरातीतील माहितीची सखोल चौकशी केल्यानंतरच सदर विवाहाची प्रक्रिया करावी.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर समारंभ-कार्यक्रम या पानावर विविध समारंभ कार्यक्रम पार पाडण्यासाठी गरजेच्या सेवा-सुविधा, वस्तू पुरवठादारांची माहिती असून सदर माहिती संबंधित जाहिरातदारांनीच पुरविलेली असल्यामुळे त्यास संकेतस्थळचालक जबाबदार नाहीत. त्याचप्रमाणे सदर सेवा-सुविधा, वस्तू विनिमय, व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्यास त्यास संकेतस्थळ चालक जबाबदार नाहीत.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळावर सल्लागार-अभिकर्ते या पानावर विविध एजंट, सल्लागार, अभिकर्ते यांच्या जाहिराती आहेत. सदर माहिती संबंधित जाहिरातदारानेच पुरविली असल्यामुळे संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत. ग्राहकाने संबंधित जाहिरातीतील माहितीची सखोल चौकशी केल्यानंतरच सदर जाहिरातदारास संपर्क साधावा. जाहिरातदाराची माहिती फसवी अथवा चुकीची आढळल्यास किंवा सदर जाहिरातदाराकडून ग्राहकाची फसवणूक झाल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार नाहीत.

  • गोपनियता धोरण:

  • या संकेतस्थळाचा वापर आपण पूर्णपणे स्वजबाबदारीने करत आहात.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळाद्वारे आपल्या परवानगीविना आपली कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त केली जात नाही.
  • आपल्याकडून वेगवेगळ्या अर्जांद्वारे संकेतस्थळाकडे वैयक्तिक माहिती प्राप्त होत असते. ही माहिती केवळ संकेतस्थळाकडेच साठविली जाते. कालांतराने जुनी माहिती संकेतस्थळावरून हटविली जाते.
  • आपल्याकडून प्राप्त झालेली माहिती संकेतस्थळ चालकाकडून कोणत्याही त्रयस्त तसेच खाजगी संस्था किंवा व्यक्तीला हस्तांतरीत किंवा पाठविली जात नाही.
  • आपण आपल्या वापरकर्ता खात्यासाठी साठविलेले पासवर्ड त्याचप्रमाणे छायाचित्र पूर्णपणे सुरक्षित असून ते कोणत्याही त्रयस्त व्यक्तीशी अथवा संस्थेशी सामायिक केले जात नाहीत.
  • आमच्या संकेतस्थळावर काही इतर संकेतस्थळांच्या लिंक दिलेल्या असतात ज्यांचे गोपनियता धोरण आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. वापरकर्त्यांनी अशा इतर संकेतस्थळांवरील गोपनियता धोरणांचा विचार करावा. कारण अशा त्रयस्त संकेतस्थळांद्वारे आपणांकडून कोणत्या प्रकारची माहिती गोळा केली जाते तसेच आपण तेथे कोणती माहिती पाठविता यावर खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळाचे कोणतेही नियंत्रण नाही.
  • आपल्या माहितीचा गैरवापर होत आहे असे निदर्शनास आल्यास आपण तात्काळ संकेतस्थळावरील संपर्क या पानाद्वारे संकेतस्थळ चालकास सूचित करावे.
  • खेडतालुकाऑनलाईन.कॉम संकेतस्थळाद्वारे आपली माहिती पूर्णपणे गोपनीय राखण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु एखाद्या त्रयस्त किंवा खाजगी व्यक्तीद्वारे अथवा संस्थेद्वारे संकेतस्थळ चालकाच्या परवानगीविना अथवा अवैध मार्गाने माहिती प्राप्त केल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार राहणार नाही.
  • संकेतस्थळावरील माहिती अवैध मार्गाने मिळवून त्रयस्त व्यक्तीने अथवा संस्थेने ती सार्वजनिक केल्यास संकेतस्थळ चालक त्यास जबाबदार राहणार नाही.
  • संकेतस्थळावरील माहिती अवैध मार्गाने मिळवून त्रयस्त व्यक्तीने अथवा संस्थेने ती सार्वजनिक केल्यास अथवा तीचा गैरवापर केल्यामुळे आपणांस होणाऱ्या शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक नुकसानीस संकेतस्थळ चालक जबाबदार राहणार नाही.